आजचाच एल्गार! रायगड जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा सकाळी ११ वाजता प्रशासनाला घेराव; मागण्यांवर निर्णायक लढा

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍ सचिन मयेकर | अलिबाग 
  • 📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६

आज रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने एकवटत असून, जिल्हा परिषद कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषद समोर सकाळी ठीक ११ वाजता हा मोर्चा धडकणार असून प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होणार आहे.दि. २९ जानेवारी रोजी पोलिसांच्या पत्रानंतर स्थगित करण्यात आलेला मोर्चा आज पुन्हा नव्या जोमाने होत आहे. संघटनेने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, मागण्यांवर तात्काळ निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल.अलिबाग पोलीस ठाणे यांच्या वतीने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.

प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय, सेवा अटी व वेतनविषयक प्रश्न संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, “आमच्या मागण्या रास्त आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लढा आणखी तीव्र होईल.”

आजचा मोर्चा रायगडच्या प्रशासनासाठी कसोटी ठरणार आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय होणार की संघर्ष अधिक तीव्र होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *