अहमदाबाद विमान अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू? प्लेन थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले!

विमानाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. जमिनीवर आदळल्यानंतर या विमानाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या आहेत. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आहे. दरम्यान, या विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातात तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.वसतीगृहाच्या इमारतीवर विमान कोसळलं
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या दहा मिनिटांत या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान एका इमारतीवर आदळले आहे. मेघानी नगरात हे विमान कोसळलं आहे. याच भागात बीजे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील वसतीगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले आहे. या वसतीगृहाच्या वर भोजनालय आहे. याच ठिकाणी विद्यार्थी दुपारचे जेवण करायला जतात. विमान थेट वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळल्यामुळे या अपघातात प्रवाशांसोबतच तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *