अशोक काकांचे भाचीकडुन खास कौतुक

मुंबई – अशोक काकांचं भाचीकडून खास कौतुक’…दिल्ली मुंबई फ्लाईटमध्ये अविस्मरणीय अनुभव… ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. काल दिल्लीहून मुंबईला येत असताना अशोक सराफ यांच्या भाचीने अनौन्समेंट करत त्यांचे कौतुक केले. अदिती परांजपे ही निवेदिता सराफ यांच्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे. अदिती पायलट असून काल तिने तिच्या विमानात बसलेल्या अशोक सराफ यांना हे सरप्राईज दिले. अशोक सराफ यांनीही उठून प्रवाशांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *