अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे; पालकांनी रंगेहाथ पकडून केले चोपाने स्वागत….आरोपी शिक्षक अटकेत
गंगापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने केलेल्या अश्लील वर्तनाने खळबळ उडाली आहे. मधल्या सुट्टीत वर्गात एकटी डबा खात असताना शिक्षकाने चिमुरडीशी लगट करत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. संतप्त पालकांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––PTI छत्रपती संभाजीनगर मंगळवार २४ नोव्हेंबर २०२५
राहुल बळीराम चव्हाण असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलगी वर्गात एकटीच डबा खात होती. त्याचवेळी आरोपी शिक्षकाने वर्गात येऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले, अशी माहिती पालकांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
यापूर्वीही अशाच प्रकाराची तक्रार मुलीने पालकांकडे केली होती.
पालकांचा संताप – रंगेहाथ पकडला शिक्षक
मुलीच्या तक्रारीनंतर पालकांनी शाळेत अचानक भेट देत परिस्थितीची खात्री करून घेतली. त्यावेळी आरोपी शिक्षक मुलीसोबत अश्लील चाळे करत असल्याचे पालकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि संतापाच्या भरात चांगलाच चोप दिला.
इतर मुलींच्याही तक्रारी
या प्रकारानंतर शाळेतील इतर काही मुलींनीही अशाच प्रकारच्या तक्रारी केल्याचे समोर आले असून प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची गंभीर दखल घेऊन गंगापूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध
पॉस्को कायदा तसेच अॅट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
लोकप्रतिनिधींची धाव
मालेगाव येथील अलीकडील अमानुष घटनेनंतर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणानंतरही पालकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. आमदार प्रशांत बंब यांनीही पोलिसांशी संपर्क साधून कठोर कारवाईचे निर्देश दिले.
![]()

