अलिबाग-रेवदंडा रस्ता हादसा : खार गल्ली, नागाव येथे ऑइलमुळे पर्यटकांच्या गाड्या घसरल्या

आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावर खार गल्ली, नागाव येथे मोठी घटना घडली. मेन रस्त्यावर ट्रक अथवा इतर वाहनातून सांडलेल्या ऑइलमुळे सुमारे ५० मीटरपर्यंतचा भाग धोकादायक झाला. यामुळे टू-व्हीलरवरून प्रवास करणारे पर्यटक अचानक घसरून पडले.

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २३ ऑगस्ट २५

सुरुवातीला काही बाईकस्वार कोसळले, त्यानंतर पुन्हा काही वेळाने इतर टू-व्हीलर सुद्धा त्या ठिकाणी घसरले. त्यामुळे अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या असून ते जखमी झाले. हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांना तातडीने मदतीला धावावे लागले.

घटनेच्या ठिकाणी जवळच असलेल्या नागाव शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे अध्यक्ष व मा. आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे समर्थक श्री.निखिल भाटकर तसेच सुरेश ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले सर्व पर्यटक सुरक्षित स्थळी हलवून त्यांना सावरले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या जड वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती, मात्र योग्य वेळी त्यांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे अनर्थ टळला.

नागरिकांनी निखिल भाटकर व सुरेश ठाकूर यांच्या तत्परतेचे आणि मदतीच्या भावनेचे कौतुक केले आहे. मात्र, या प्रकरणामुळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *