अलिबाग ब्राम्हण आळीतील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवाचा जल्लोष, संध्याकाळी भव्य मिरवणूक 🚩

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, अलिबाग, गुरुवार २६ मार्च २०२६

अलिबाग शहरातील ब्राम्हण आळी येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले.

सकाळपासून पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. दरम्यान, संध्याकाळी श्रीरामाची भव्य पालखी मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली. “जय श्रीराम”च्या घोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताका आणि भाविकांचा उत्साह यामुळे मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली.

अलिबागमध्ये रामनवमीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

🎥 👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *