अलिबाग न्यायालयाचा धडाकेबाज निकाल— कुरुळ टेकडी गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेप; ६० हजारांचा दंड

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, कुरूळ अलिबाग 📅 गुरुवार | २६ फेब्रुवारी २०२६

अलिबाग तालुक्यातील कुरुळ टेकडीवर पाच वर्षांपूर्वी घडलेल्या थरारक गोळीबार व हत्या प्रकरणात अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल देत मुख्य आरोपी समीर ऊर्फ लालदेव चव्हाण याला आजन्म कारावास व ₹६०,००० दंड अशी शिक्षा सुनावली.

हा खटला अलिबाग सत्र न्यायालय येथे चालला. सुनावणीदरम्यान संतोष भगत (जिल्हा व सत्र न्यायाधीश-३) यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत हा निकाल दिला. सरकारी बाजू मांडताना जिल्हा सरकारी वकील संतोष पवार यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.

 नेमकी घटना काय?

३१ मार्च २०१९ रोजी रात्री कुरुळ टेकडीवर ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादी जितेंद्र मगर व त्याचे सहकारी पार्टीसाठी टेकडीवर गेले होते. मध्यरात्री परतत असताना, दबा धरून बसलेल्या आरोपींनी पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला.या भीषण हल्ल्यात सागर पाटील आणि गौरव भगत गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान सागर पाटील यांचा मृत्यू झाला

या प्रकरणाचा तपास अलिबाग पोलीस ठाणे चे तत्कालीन पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी सखोलपणे केला. तपासादरम्यान उघड झाले की, वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने  राजेंद्र मगर  मित्रांच्या मदतीने हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

⚖️ न्यायालयाचा निर्णय

खटल्यादरम्यान जखमी साक्षीदाराची ठोस साक्ष तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले भक्कम पुरावे फिर्यादीची जबानी या सर्व बाबी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी समीर ऊर्फ लालदेव चव्हाण याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि ₹६० हजार दंड ठोठावला.  “जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच रचला हत्येचा कट”  न्यायालयाच्या निर्णयाने तालुक्यात खळबळ

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *