अलिबागच्या वाळूत तारेवरचं बालजीवन — मनोरंजन नव्हे जगण्यासाठीची कसरत

अलिबागच्या वाळूत लहान ‘शोभायात्रा पोटासाठी दोरीवर नाचणारी बालजीवनाची तारेवरची कसरत

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–अलिबाग शनिवार २५ ऑक्टोबर २०२५

किनाऱ्याच्या एका टोकाला दोन लाकडी त्रिकोणांना दोरी बांधून, त्यावरून एक छोटीशी, साधारण दहा वर्षांची मुलगी पायात ताटली घेऊन चालत होती. कधी टायरवरून फिरत, कधी तारेवरची कसरत दाखवत ती आपला संसार चालवण्यासाठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. तिच्या प्रत्येक पावलात भीती नव्हती, तर जगण्याची लढाई होती.

दोरीवरील त्या छोट्याशा पावलांमध्ये एक कलाकाराचा आत्मविश्वास आणि एक उपाशी पोटाचा आवाज दडलेला होता. लोकांनी कौतुकाने पाहिलं, मोबाईलमध्ये क्षण टिपले, पण ताटलीत फारसे नाणे पडले नाहीत.

समुद्राच्या गार वाऱ्यांमध्ये आणि फुलोऱ्यांनी सजलेल्या किनाऱ्यावर, ही मुलगी आपला दिवा पेटवत होती  मनोरंजनासाठी नाही, जगण्यासाठी.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *