अलिबागच्या कराटे पट्टूंचा राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दबदबा कायम

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे ,|अलिबाग 📅 सोमवार | २३ फेब्रुवारी २०२६

६वी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पनवेल येथे झाले.  सहा राज्याच्या ३२० खेळाडूंनी या स्पर्धेत कटा व कुमिते या दोन्ही विभागात सहभाग घेतला होता.  स्पर्धेचे आयोजन क्योशी राजू कोळी यांनी उत्कृष्टरित्या पार पडलं.अलिबाग मधील जपान शिटोऱ्यू कराटे डॉ, इंडिया संघाच्या १५ कराटेपटूंनी *क्योशी राहुल श. तावडे* (८ डॅन ब्लॅक बेल्ट, जपान) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावत सर्वात जास्त १३ सुवर्णपदक मिळवण्याचा व “६वा सोके चॅम्पियनशिप -२०२६” कप पटकावण्याचा मान मिळवला. 

विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत 

ओवी गायकर, कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण, श्रीयांस तावडे कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण, मुमुक्षा घरत, कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण, सार्थक मोरे कटा – सुवर्ण कुमिते – सुवर्ण, रजाक मुजावर कटा – कांस्य  कुमिते – सुवर्ण, रुद्र नाईक कटा – रौप्य कुमिते – सुवर्ण, श्रीनिष मढवी कटा – कांस्य  कुमिते – सुवर्ण, हर्षाली जाधव कटा – रौप्य कुमिते – सुवर्ण, त्रीश सुतार कटा – रोप्य कुमिते – रोप्य,  हुनर जैन कटा – रोप्य कुमिते – कांस्य युवराजसिंग दसाना कटा – कांस्य  कुमिते – कांस्य, स्वरूप दडस कटा – कांस्य कुमिते – कांस्य, काव्या तुपट कुमिते – कांस्य स्वरांगी दडस कुमिते – कांस्य, तनिष्क तावडे कुमिते – सुवर्ण

या कराटेपटूंचे अलिबाग मध्ये सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *