अखेर नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांच्या प्रयत्नांना यश डावाळे परिसरात Switching Station / MSEB Substation प्रकल्पासाठी जागेचे भाडेतत्त्वावर हस्तांतरण अधिकृतरित्या पूर्ण

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे , अलिबाग 📅 बुधवार | २५ फेब्रुवारी २०२६

नागाव ग्रामपंचायत हद्दीतील डावाळे परिसरात प्रस्तावित Switching Station / MSEB Substation प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भाडेतत्त्वावर हस्तांतरण अखेर अधिकृतरित्या पूर्ण झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे काम तसेच मागील दोन महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेली प्रशासकीय प्रक्रिया आज पूर्णत्वास गेली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता आणि तेव्हापासून या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

या यशामागे नागाव गावच्या सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठाम भूमिका आणि वैयक्तिक प्रयत्नांचा मोठा वाटा असून, त्यांच्या नेतृत्वामुळे ही दीर्घकाळ प्रलंबित प्रक्रिया मार्गी लागली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मा. तहसीलदार श्री.विक्रम पाटील सर, मा. कलेक्टर श्री.किशन जावळे सर, MSEB मुख्याधिकारी श्री.शैलेश कुमार सर तसेच मा. रजिस्टर ऑफिसर श्री.सोपेकर सर , माजी सरपंच श्री.निखिल नंदकुमार मयेकर, माजी बांधकाम सभापती व सदस्य श्री.राजेंद्र मयेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले — सर्वांचे मनापासून आभार.

सद्यस्थितीत थळ येथील सबस्टेशनवरून कोर्लईपर्यंतच्या लाईनद्वारे नागाव परिसराला विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे, मोठ्या विद्युत लोडमुळे नागरिकांना कमी व्होल्टेज, लाईट फ्लक्चुएशन, वारंवार वीजखंडित व अनियमित वीजपुरवठा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डावाळे येथे उभारण्यात येणाऱ्या Switching Station / Substation प्रकल्पामुळे नागाव व परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेत मूलभूत बदल होणार असून good voltage, load shedding, लाईन ओव्हरलोड, voltage fluctuation यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

याबाबत सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांनी सांगितले की,
“गावाच्या विकासासाठी आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. हा प्रकल्प केवळ नागावपुरता मर्यादित नसून, लवकरच पूर्ण होऊन नागावसह आजूबाजूच्या इतर गावांनाही ( नागांव ते कोर्लईपर्यंत ) याचा थेट लाभ होणार आहे.”

या हस्तांतरणामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढील टप्प्यास अधिकृत मार्ग मोकळा झाला असून, लवकरच Substation प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
हा प्रकल्प नागाव व परिसराच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण, दीर्घकालीन आणि परिणामकारक पाऊल ठरणार आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *