आक्षी –साखर हादरले शुक्रवारी सकाळी बिबट्याचा एक नाही तर दोन लोकांवर सलग हल्ला – अवघ्या ४१ मिनिटांत दहशत
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — शुक्रवार १२ डिसेंबर २०२५
पहाटेचा वेळ परिसर शांत… आणि अचानक भीतीला जाग आलं!
आज सकाळी नेमके ६ वाजून ०४ मिनिटांनी, अक्षी–साखर येथील हॉटेल आनंद जवळ एका व्यक्तीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. काही मिनिटांतच, ६.४५ वाजता, दुसऱ्या व्यक्तीवरही त्याच बिबट्याने जोरदार झडप घातली. दोन्ही घटनांमुळे गावात अक्षरशः भीतीची लाट पसरली आहे.
या हल्ल्यातआनंद निषाद — गंभीररीत्या रक्तबंबाळ जखमी झाले आहेत,तर दुसऱ्या व्यक्तीलाही खोल जखमा झाल्याचे प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले आहे.ही माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या अक्षी ग्रामस्थांनी आणि राकेश गण यांनी ‘छावा’कडे तातडीने पोहोचवली आहे.
(जखमींची नावं स्थानिक साक्षीदारांनी पुष्टी केली आहेत; अधिकृत नोंद अद्याप येणे बाकी.)
वनविभागाला तात्काळ कळविले — गावात भीतीचा माहोल
हल्ल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने माहिती दिली असून
परिसरात एकच घबराट निर्माण झाली आहे.
लोकं घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत;
कोळी बांधव समुद्रावर जाण्यास थांबले

अलिबाग तालुक्यातील अक्षी–साखर परिसर आज शुक्रवारी सकाळी अक्षरशः थरथरला. पहाटेचे शांत वातावरण भेदत सहा वाजून चार मिनिटांनी (06:04 AM) आनंद हॉटेल–पकट्टीजवळून जाणाऱ्या आनंद निशाद या व्यक्तीवर बिबट्याने झडप घालत भीषण हल्ला केला. क्षणभरात परिसर आरडाओरडांनी दणाणून गेला.
पण दहशत इथेच संपली नाही…
याच भागात अवघ्या ४१ मिनिटांनी, म्हणजेच सहा वाजून 45 मिनिटांनी (06:45 AM) दुसऱ्या व्यक्तीवरही बिबट्याने पुन्हा हल्ला केला, आणि अक्षी–साखर परिसरात हाहाकार माजला. सलग दोन हल्ल्यांमुळे नागरिक अंगावर काटा येईल इतके घाबरले आहेत.
स्थानिक सांगतात की बिबट्याची हालचाल रात्रीपासूनच जाणवत होती, पण सकाळी मानवी वावर वाढताच त्याने थेट लोकांवर निशाणा साधला. दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे.
या सलग हल्ल्यांमुळे आक्षी –साखर, नागाव, रेवदंडा, या संपूर्ण किनारपट्टी भागात भीतीचं सावट अधिक दाटलं आहे. मुलांना बाहेर जाण्यास मज्जाव, महिलांनी एकटं न फिरण्याच्या सूचना नागरिक पूर्णत: सावध मोडमध्ये गेले आहेत.
प्रशासनाने अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाल दिसताच तातडीने माहिती देण्याचे निर्देश दिले आहे
वनविभागाला ही माहिती ग्रामस्थांनी तात्काळ कळवली असून सध्या सर्व जण भीतीने अक्षरशः घाबरलेल्या अवस्थेत आहेत. कारण याआधी नागावमध्ये बिबट्याने असा हैदोस मांडला होता की तब्बल सहा जण जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले होते. सलग हल्ले, नागरिकांचा आक्रोश आणि भीतीचा पसरलेला माहोल — पण तरीही त्या वेळी वनविभाग, रेस्क्यू टीम आणि पोलीस यंत्रणा इतक्या मोठ्या शोधमोहीमेनंतरही बिबट्याला शोधण्यात अपयशी ठरल्या होत्या.
शोधमोहीम निष्फळ, यंत्रणा मागे, आणि लोकं अक्षरशः वाऱ्यावर…
जंगलात गेला असेल, दिसत नाही, सावध रहा एवढाच संदेश देऊन सर्व टीम्स माघारी फिरल्या आणि संपूर्ण नागाव–साखर परिसर निर्दयीपणे स्वतःच्या जबाबदारीवरच सोडला गेला.
आणि या काळात सर्वप्रथम, सर्वात आधी, सर्वात अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणारा एकच आवाज होता —
छावा!
घटनास्थळावरून प्रथमतः खरी व स्पष्ट बातमी छावानेच दिली, परिस्थिती किती गंभीर आहे हे सर्वात आधी छावानेच प्रसिद्ध केले, आणि नागाव–साखर परिसराला सावध राहण्याचा इशारा दिला.
आजही स्थिती तशीच गंभीर असून ग्रामस्थांचा संताप एकच —
“बिबट्या सापडत नाहीय, पण धोका मात्र आमच्या डोक्यावरच!”
आज अक्षी–साखर परिसरात झालेल्या दोन्ही हल्ल्यांची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी, राकेश गण यांनी आणि आक्षी ग्रामस्थ यांनी तात्काळ छावापर्यंत पोहोचवली.
यामुळे ही धक्कादायक घटना सर्वात आधी आणि सर्वात अचूक स्वरूपात लोकांसमोर आणण्यास छावाला यश आले.
जखमी व्यक्तीचे नाव आनंद निषाद असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली असून, ग्रामसमर्थ आणि राकेश गण यांनीही हीच माहिती पुष्टी केली आहे. अधिकृत नोंद अद्याप येणे बाकी आहे.

![]()

