Views: 4

• राज्य शासनाचा मदत कक्ष सक्रिय

• छावा • मुंबई, दि. १२ जून • प्रतिनिधी

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या आंतरराष्ट्रीय विमानाचा गंभीर अपघात झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत किती प्रवासी जखमी झाले किंवा हताहत झाले याबाबत तपशील समोर येत असतानाच, प्रशासकीय स्तरावर तात्काळ कृती आणि मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

AI १७१ हे विमान अहमदाबादहून लंडनकडे जात असताना तांत्रिक बिघाडामुळे अचानक आपत्कालीन परिस्थितीत सापडले. अपघाताचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अहवालानुसार विमानात असलेल्या अनेक प्रवाशांना दुखापत झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आणि राज्य यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

“नातेवाईक आणि नागरिकांसाठी मदत सेवा सुरू करण्यात आली असून, या कक्षामार्फत प्रवाशांबाबतची माहिती, त्यांच्या प्रकृतीचा आढावा, तसेच संपर्क माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.” • सतीशकुमार खडके (भा.प्र.से.),संचालक : आपत्ती व्यवस्थापन प्रभाग

या अपघातात प्रवास करणाऱ्या नागरिकांचे नातेवाईक व या घटनेने प्रभावित झालेल्या नागरिकांना आवश्यक माहिती व साहाय्य त्वरित मिळावे यासाठी खालील हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत :

राज्य शासनाने हा मदत कक्ष सक्रिय करून दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही प्रशंसनीय असून अपघातग्रस्त प्रवाशांचे नातेवाईक या सुविधेमुळे थोडा दिलासा अनुभवू शकतील.