Views: 55

ऑफिस पार्टीत महिला सहकाऱ्यावर बलात्कार; 

छावा दि.०३ जून रेवदंडा (सचिन मयेकर)

मुंबईतील एका खासगी कंपनीच्या ऑफिस पार्टीसाठी अलिबागमध्ये आलेल्या २५ वर्षीय महिला कर्मचार्‍यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी अभिषेक सावडेकर (वय २५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० जून ते १ जुलै दरम्यान मुशेत येथील अलास्का व्हिला येथे घडली.

चौदा सहकाऱ्यांसह पार्टीसाठी आलेल्या महिलेने सुरुवातीला ऑफिसचं काम पूर्ण केलं आणि रात्री साडेआठच्या सुमारास पार्टीमध्ये सहभागी झाली. मद्यपानानंतर ती जलतरण तलावाजवळ झोपली असताना काही सहकाऱ्यांनी तिला व्हिलातील बेडरूममध्ये झोपवलं.

पहाटे तीनच्या सुमारास तिच्या शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यावर जबरदस्ती होत असल्याची जाणीव झाली. ती उठल्यानंतर आरोपी सावडेकर रुममधून बाहेर पडताना दिसला. सकाळी विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला टाळाटाळ केली, मात्र नंतर माफी मागितली.

पीडितेच्या तक्रारीवरून अलिबाग पोलिसांनी अभिषेक सावडेकरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Loading