भारतातील आणीबाणीच्या ५० वर्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘संविधान हत्या दिवस २०२५’ निमित्त रायगड जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले.
कार्यक्रमात आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानींचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सेनानींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या छायाचित्र प्रदर्शनामध्ये भारतातील पुरातन लोकशाही परंपरा, लोकांचा सहभाग, शासनातील सामूहिक भागीदारी, ग्रामीण व शहरी लोकशाही व्यवस्था, आणीबाणीपूर्व व पश्चात परिस्थिती, माध्यमांवरील निर्बंध, राजकीय चळवळी, जनआंदोलने व लोकशाही मूल्यांचे पुनरुज्जीवन यांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यक्रमात गिरीष तुळपुळे, नंदकुमार चाळके, विलास तोडकर, दामोदर देवधर, शांताराम तांडेल, शंकर तुरे, विश्वास मुळये, नरेंद्र जाधव, श्रीवधर करमरकर, नारायण म्हात्रे, विजय घाडगे, सदानंद कर्णेकर, अनिल आचार्य, नथुरामा गायकर, मधुकर खोत, रघुनंदन देशपांडे, जयंत भाटे, प्रमिला कुलकर्णी (मिनल सोमण), नारायण दळवी, प्रल्हाद भाटे, विनायक गद्रे, सुधीर महाजन, पदमाकर पिंपुटकर, त्रिंबक पुरोहीत, दत्तात्रेय साळुंखे, सरिता गांधी, सुरेखा कोलते, अलका जाधव, अलका पाटील, राजन ठाकूर, महेश्वर देशमुख, निला तुळपुळे, हेमंत क-हाडकर, उत्तरा गांगल, अच्युत कोडगीरे, रुचा पाठक (कै. अरुण पाठक), अनंत साने, सुषमा भावे, प्रकाश निजामपुरकर, दिनानाथ पोलेकर, शैलेजा साठे या लोकतंत्र सेनानींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी काही लोकतंत्र सेनानींनी आपले अनुभव कथन करत आणीबाणीच्या आठवणी जागवल्या. लोकशाहीसाठी लढलेली ही लढाई स्मरणात ठेवत आजच्या पिढीने लोकशाही मूल्यांची जपणूक करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.