Views: 9

• ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

छावा • अलिबाग, दि. १६ जून • प्रतिनिधी

झिराड ग्रामपंचायत क्षेत्रातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव ‘दिलीप ऊर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. महेंद्रशेठ दळवी, रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी मा. श्री. रवींद्र शेळके आणि मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. दीपक भोई उपस्थित होते.

कार्यक्रमाला झिराड ग्रामपंचायतीच्या प्रशासक मा. सौ. प्रेरणा भोईर, ग्रामविकास अधिकारी श्री. संजय पाटील, माजी सरपंच श्री. प्रविण कदम, तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री. गोरक्षनाथ कडवे, श्री. अभिलाष माळवी, श्री. अशोक थळे, श्री. महेश माने, श्री. विरेश खेडेकर, श्री. सुहास म्हात्रे, श्री. मनोज म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच झिराड व मिळकतखार ग्रामपंचायतीचे माजी व सध्याचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, झिराड प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. कु. विघ्नेश थळे याने उच्च माध्यमिक परीक्षेत ९५% गुण मिळवून विशेष यश संपादन केले असून त्याचा विशेष गौरव करण्यात आला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला असून, ग्रामपातळीवर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांचे महत्व अधोरेखित करणारा ठरला.

Loading