Views: 6

• मुख्यमंत्र्यांकडून समागमाच्या यशासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही

• राज्यस्तरीय समितीची वर्षा निवासस्थानी बैठक

• छावा • मुंबई, दि १३ जून • प्रतिनिधी

गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शाहिदी वर्षानिमित्त आणि श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या गुरु-ता-गद्दी समागमाच्या निमित्ताने राज्यात तीन ठिकाणी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नांदेड, नागपूर व नवी मुंबई येथे होणाऱ्या या समागमांच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ येथे या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस समितीचे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, धर्मगुरू संत श्री बाबूसिंह महाराज, संत रघुमुनी महाराज, गोपाल चैतन्यजी महाराज, शरद ढोले तसेच वरिष्ठ अधिकारी आणि समन्वयक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत अन्यायाविरुद्ध संघर्ष करत समाजासाठी बलिदान दिले. त्यांच्या शौर्याची गाथा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या समागमांतून केवळ इतिहास सांगणे नव्हे, तर नव्या पिढीला त्यांची जबाबदारीही समजावून दिली जाईल.”

राज्यात होणाऱ्या या कार्यक्रमांतून विविध समाज घटक एकत्र येणार असून, एकात्मतेचा संदेश दिला जाईल. याचे माध्यम होऊन देशाच्या मजबुतीसाठी लढणाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करत सांगितले की,

बैठकीच्या प्रारंभी संत श्री बाबूसिंह महाराज, संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा व शरदराव ढोले यांनी समागमाच्या उद्देशांवर आपले विचार मांडले.

या बैठकीला मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह, अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.