Views: 134

• दूध सोसायटी व शिधा केंद्र संरचनेचे नुकसान

• मध्यरात्री वाहनाची धडक ; चालक पसार

• छावा • रेवदंडा, ता. १३ जून • प्रतिनिधी

रेवदंडा येथील सहकारी दूध तथा शासकीय शिधा वाटप केंद्राच्या इमारतीस मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. सदर घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

सदर अपघातामध्ये इमारतीच्या बाहेरील भिंतीचे आणि झडपांची मोठी पडझड झाली असून अनेक लाकडी साहित्य रस्त्यावर विखुरले गेले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेपूर्वीही रेवदंड्यात अशाच प्रकारची एक घटना घडली होती. येथील स्थानिक व्यापारी अमित म्हात्रे यांच्या दुचाकीला देखील काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. या घटनेत त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये रस्त्यावरील अराजकता आणि वाहतूक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत तातडीने संबंधित वाहन व चालकाचा तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Loading